जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यातच मौदा तालुक्यात अनेक गावात धान पिकाचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्री मौदा तालुक्यातील तारसा गावातील शेतात झालल्या नुकसानीची आज गुरुवारी पाहणी केली.
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील (Crop Damage) पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण घरांचीही पडझड झाली आहे. यंदा पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे विदर्भात झाले आहे. रामटेकचे शिवसेना (Krupal Tumane) खा. कृपाल तुमाने यांनी नागपूर जिल्ह्यातील पीक नुकसानीची तर पाहणी केलीच शिवाय पडझड झालेल्या घरांचीही पाहणी करीत ग्रामस्थांनी मदतीचे आश्वासन दिले. एकीकडे शिंदे गटाचे आमदार नुकसान झालेल्या भागाची पाहणी करीत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार आता ग्रामस्थांच्या मदतीला धावून येऊ लागल्याचे चित्र विदर्भात आहे. तुमाने यांनी कुही तालुक्यातील वेलतूर, पांडेगाव, सिल्ली, टेकेपार, मुरंबी या गावांचा दौरा केला.