Breaking News

वजन कमी करण्यासाठी चुकूनही धावू नका : तज्ज्ञ काय सांगतात…

Advertisements

वजन कमी करण्यासाठी धावण्याचा मार्ग निवडला जातोय, पण खरंच धावणे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का? हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी धावणे एक चांगला पर्याय आहे, पण वजन कमी करण्याचा थेट उपाय नाही. हो, हे खरंय. हेड स्ट्रेंथ आणि कंडिशनिंगचे कोच बासू शंकर सांगतात, “तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करा, वेटलिफ्टिंगसह धावण्याचा सराव करा, यामुळे वजन कमी होऊ शकते. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या विषयी माहिती दिली.

Advertisements

द इंडियन एक्स्प्रेसनी फिटनेसतज्ज्ञ गरिमा गोयल यांच्या हवाल्याने या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. जर कोणी वजन कमी करण्याचा विचार करत असेल तर सुरुवातीला धावणे सुरू करतात. गरिमा गोयल सांगतात, “धावण्याचे निःसंशयपणे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत, पण वजन कमी करताना फक्त धावण्यावर अवलंबून राहू नका. या बरोबरच पचनशील असा आहार आणि व्यायाम करणे गरजेचे आहे.”निरोगी जीवनासाठी शरीरात ऊर्जा असणे अत्यंत आवश्यक आहे. वजन कमी करताना ऊर्जा संतुलित ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे. आपण किती कॅलरीयुक्त आहार घेतला आणि वजन कमी करताना किती कॅलरी बर्न केले, याचा समतोल राखणे आवश्यक आहे. धावताना कॅलरी कमी होतात, पण याचा परिणाम शरीरातील ऊर्जेवर पडू नये, हे समजून घेणे गरजेचे आहे.

Advertisements

आपले शरीर खूप लवकर कोणत्याही गोष्टीमध्ये अनुकूलता दाखवते. जेव्हा वजन कमी करण्यासाठी एखादी व्यक्ती धावायला सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीला कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण कमी असू शकते. पण, कॅलरी बर्न करण्यासाठी जर तुम्ही सातत्याने आणि खूप जास्त वेळ धावत असाल तर यामुळे शरीरातील ऊर्जेचा अधिक वापर केला जातो, ज्यामुळे वजन कमी करणे कमी होते. यासाठी व्यायाम करताना थोडा फार बदल करणे आवश्यक आहे.धावणे आणि भूक लागणे यांच्यातील संबंध एक महत्त्वाचा घटक आहे, जो वजन कमी करताना अडथळा निर्माण करू शकतो. व्यायाम केल्यामुळे भूक लागते, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये फरक दिसून येतो. काहींना धावल्यानंतर भूक लागते. नीट आहार घेतला नाही तर तुम्ही जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाऊ शकता. धावल्यानंतर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही काय खात आहात, हे वजन कमी करण्यात आणि टिकवून ठेवण्यास मदत करतात.

दीर्घकाळासाठी वजन कमी करताना आपल्या शारीरिक आणि मानसिक वर्तणुकीत बदल दिसून येतो. गोयल सांगतात, “खूप जास्त धावण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आहार घेण्याची पद्धत आणि जीवनशैलीकडे दुर्लक्ष होऊ शकते. दीर्घकाळासाठी वजन कमी करताना चांगला आहार, तणावमुक्त राहणे आणि चांगली झोप अत्यंत आवश्यक आहे.”“वय, आनुवंशिकता, हार्मोनल चढउतार आणि पूर्वीपासून जर तुम्हाला एखादी आरोग्याची समस्या असेल आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठी धावत असाल, तर तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.” गोयल पुढे सांगतात,

शेवटी धावणे हा निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि दीर्घकाळासाठी वजन नियंत्रित करण्यास मदत करू शकतो, पण त्याबरोबरच संतुलित आहार आणि चांगल्या खाण्याच्या सवयी आणि धावण्यासह व्यायाम करणेही तितकेच आवश्यक आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता पक्का करेगा!

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता …

उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित असाल तर..!

शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तज्ज्ञ रोज १० ते १२ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *