Breaking News

शास्त्रासोबतच शस्त्राचं सुद्धा अध्ययन आवश्यक – ह.भ.प. तेजस्विनी कुळकर्णी यांचे प्रतिपादन

शास्त्रासोबतच शस्त्राचं सुद्धा अध्ययन आवश्यक – ह.भ.प. तेजस्विनी कुळकर्णी यांचे प्रतिपादन

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट

यवतमाळ। भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।। जेव्हा जेव्हा धर्माचरणाचा र्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व वाढते, त्या वेळी हे भारता मी अवतीर्ण होतो.आपल्या शरीरात सुद्धा त्या परमतत्त्वाचं अस्तित्व आहे, तेव्हा हे वचन सुद्धा आपल्याला लागू होतं. देश, धर्म, संस्कृती जर संकटात असेल तर जीवन अर्थशुन्य होणारच. शास्त्र हे धर्म आणि संस्कृती रक्षणाचं शिक्षण देतं, तर शस्त्र हे देश रक्षणाचं अस्त्र आहे. आणि म्हणून….“शास्त्रासोबतच शस्त्राचं सुद्धा अध्ययन आवश्यक आहे!” असे प्रतिपादन ह.भ.प. तेजस्विनी कुळकर्णी यांनी केले. कीर्तन ्महोत्सव आयोजन समिती द्वारा आयोजित भव्य कीर्तन महोत्सवात द्वितीय कीर्तन पुष्प गुंफतांना संतश्रेष्ठ तुकोबारायाचा अभंग “आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया।।” निरूपण करतांना त्या बोलत होत्या. हे विश्वची माझे घरं… वसुधैव् कुटुंबकम् ही आपली संस्कृती म्हणून समर्थ `चिंता करतो विश्वाची’ असे बालवयात म्हणतात ! स्वहितासोबतच समष्टीच हित जपणारी आपली संत परंपरा, जीवनाचं सार्थक कशात आहे हे आम्हाला शिकविते आणि आमचा परमेष्टीचा मार्ग प्रशस्त करते. स्वहितासोबतच आम्हाला स्वदेश.., स्वदेव… आणि स्वधर्मीच हित सुद्धा जपावं लागेल. गुरू गोविंदसिंहांनी जे केलं ते आम्हालाही करावं लागेल. जसं शेतकरी आपल्या पिकाचं रक्षण करतांना तृणाचा नाश करतो तसं “परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्” हे तत्त्व अंगीकारावं लागेल. या वचना बरोबरच त्यांनी आपल्या कीर्तनाचा पूर्वरंग कथन केला. कीर्तनकाराचे स्वागत माधवीताई देशपांडे यांनी केले. संवादिनी वादक गंगाधरराव देव यांनी `नारायणा रमारमना’ हे भक्तीगीत गाऊन सुमधुर गानसेवा सादर केली. श्रीधर कोरडे यांनी तबल्यावर उत्तम साथ दिली.

“आधी लगिन कोंडण्याचं” म्हणत उदयभान सरदाराची भंबेरी उडवून देणार्या तानाजी मालुसरेंचे आख्यान सादर करून कीर्तनकारांनी ह.भ.प. तेजस्विनींनी सौदामीनीच रूप धारण करीत वीर रसात छत्रपती शिवराया, माता जीजाऊ, शेलारमामा, बाणेदार तानाजी या विविध पात्रांचा जणू साभिनय एकपात्री नाट्य प्रयोगच श्रोत्यांच्या अंत:चक्षु पुढे उभा केला. पोवाडा… गोंधळ, आणि कारूण्य रसात तानाजीसाठी हळहळणारे शिवबा, माता जीजाऊंचे चलचित्र दृष्टीगोचर केले. “जा..! एकदा सिंहगडावर जा…! ” तिथली माती आपल्या कपाळावर लावा. तुमचं रक्त भगवं होईल ! जय तानाजी..! जय शिवाजी. ज़य जय श्रीराम । अशा घोषणा देऊन त्यांनी आपल्या कीर्तनाची सांगता केली.

आरतीचे यजमानपद अलकाताई भिसे, सपना कदम, कल्पना जोशी, आशा उत्तरवार, वीणा वरभे, सौ. ढोणे, भावना भिसे यांनी भूषविले

About विश्व भारत

Check Also

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद जी सरस्वती के बयान से मचा है हंगामा

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद जी सरस्वती के बयान से मचा है हंगामा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

महादूला येथे आखाडी पुजेचा समारोप

आज दि.16/07/24 मंगळवार ला महादुला येथे आखाडी पुजा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व आनंदात पार पडला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *