Breaking News

नागपूर जिल्ह्यात होणार मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट?वाचा

Advertisements

७ जानेवारीला हवामान कोरडे राहण्याची आणि आठ जानेवारीला तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच सहा ते आठ जानेवारीला खूप हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेता कापणी केलेला धान, तूर तसेच वेचणी केलेला कापूस सुरक्षित ठिकाणी साठवावा. धान, तूर व इतर पिकाची मळणी शक्य नसल्यास शेतमाल हा प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.

Advertisements

कृषी रसायनांच्या फवारणीची कामे पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज लक्षात घेता पुढे ढकलावी. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी व शेतमजूर बांधवांनी स्वतःची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी. विजेपासून संरक्षणासाठी झाडाखाली आश्रय घेणे कटाक्षाने टाळावे तसेच पशुधनाचा झाडाखाली आश्रय टाळावा. विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे.

Advertisements

जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर व न ठेवता शेड मध्येच साठवावा, असे जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्रीय कापूस संशोधन संस्था व प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बे मौसम बारिश और ओलावृष्टि के कहर से किसानों के चेहरे पर छाई मायूसी

बे मौसम बारिश और ओलावृष्टि के कहर से किसानों के चेहरे पर छाई मायूसी टेकचंद्र …

नि:शुल्क राशन के साथ फ्री में मिलेगी 10 किलो वाली कैरीबैग? राशन कार्ड धारक नागरिक उठायें लाभ

नि:शुल्क राशन के साथ फ्री में मिलेगी 10 किलो वाली कैरीबैग? राशन कार्ड धारक नागरिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *