Breaking News

निव्वळ चर्चा आणि आरोप : तलाठी भरती रद्द केल्यास चुकीचा संदेश जाणार

Advertisements

तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याचे उघड झाले आहे. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तलाठी भरती घोळ झाल्याचा पुरावा असल्यास द्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे. चर्चा आणि आरोप यावर भरती रद्द केल्यास चुकीचा संदेश जाईल, असा प्रवाह सरकारमधील काही मंत्र्यांचा आहे.

Advertisements

राज्यातून आठ लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली. गुण ठरवण्यासाठी सामान्यीकरणाचे (नॉर्मलायझेशन) सूत्र वापरल्याने अधिकचे गुण दिसत असल्याचे स्पष्टीकरण महसूल विभागाकडून देण्यात आले. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण आहेत. एकाला २०२.४५ तर दुसऱ्याला १९४.०६९ गुण आहेत. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. यात क्रमश: २०१.३३, १९९.८९ व १९५.२७ गुण आहेत. असाच प्रकार २०१९च्या तलाठी भरतीमध्येही घडला होता. तेव्हा हा घोटाळा उघडकीस आणला होता.

Advertisements

‘सरकारने तपासात पुढाकार घ्यावा’

तलाठी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करू, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतली. मात्र, आरोप होत असताना शासन स्वत: दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी का करीत नाही, परीक्षा देणारा विद्यार्थी पुरावे कुठून देणार, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी केला आहे. तसेच परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे सर्व केंद्रांचे चित्रीकरण आहे. त्यातून तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे

सखोल चौकशी करा- सुप्रिया सुळे
नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. या परीक्षांसाठी खूपच परीक्षा शुल्क आकारले जाते. या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक : नागपूर किती?

दिवसेंदिवस तापमान वाढत आहे.विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक नोंदवले गेले. आज ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद …

पदभरती रखडली : आचारसंहितेनंतर नियुक्ती मिळणार?

राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु आचारसंहितेमुळे नियुक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *