Breaking News

तलाठी भरतीविरोधात असंतोष : छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये लाखो परीक्षार्थी रस्त्यावर

Advertisements

तलाठी भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार, गुणवत्ता यादीत आलेले ‘टीसीएस’मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि सर्व प्रकरांकडे होणारे दुर्लक्ष या विरोधात परीक्षार्थीनी छत्रपती संभाजी नगर आणि बीड शहरात मंगळवारी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केला.

Advertisements

भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही? लोकसेवा आयोगामार्फत केवळ २९६ रुपये शुल्क आकारले जाते, मग खासगी कंपन्या अतिरिक्त शुल्क का घेतात? परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकार विशेष तपास पथकाची नेमणूक का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न परीक्षार्थी आंदोलकांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजी नगरमधील क्रांती चौकात हजारोंच्या संख्येत जमलेल्या परीक्षार्थीनी शासनाच्या भरती प्रक्रियेतील अनागोंदीचा निषेध नोंदवला. छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच बीड येथेही परीक्षार्थीनी ‘सरकार गैरप्रकारांची चौकशी का करीत नाही,’ असा प्रश्न उपस्थित केला. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १.३० दरम्यान परीक्षार्थीनी हे आंदोलन केले.

Advertisements

कोणाच्या विरोधात नाही. सरकारच्याही विरोधात नाही. मात्र, परीक्षा पारदर्शकपणे व्हायला हव्यात, असे स्पर्धा परीक्षा पेपर फूटविरोधी कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले. तलाठी भरतीमध्ये पुन्हा गैरव्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे विद्यार्थी कसे जमव णार, असा सवाल परीक्षार्थीनी केला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चुकीचे सांगत आहेत. सरकारने शंका दूर करणे आवश्यक आहेच, पण भरती प्रक्रिया राबवण्यासाठी खासगी कंपन्यांचा एवढा अट्टहास कशासाठी, असा सवालही परीक्षार्थी आंदोलकांनी केला.

आंदोलकांवर गुन्हे
बीड शहरात सार्वजनिक रस्ता बंद करून रहदारीत अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या धनंजय गुंदेकर, राहुल कांबळे, राहुल कवठेकर आणि सचिन ठेंगळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरती विरोधात संशय निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता.

परीक्षार्थीच्या तक्रारी..
* भरती प्रक्रियेसाठीचे शुल्क भरमसाठ.

* आरोग्य भरतीसाठी दोन वेगवेगळी परीक्षा केंद्रे.

* तलाठी भरतीच्या २०० गुणांच्या पत्रिकेतही गैरव्यवहार.

* भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही?

Advertisements

About विश्व भारत

Check Also

रेतीच्या ट्रॅक्टरने कोतवालास चिरडले : घटनास्थळीच…!

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल विभागाच्या कोतवालास ट्रॅक्टरने चिरडले. या कोतवालाचा …

नागपुरातील अधिकारी गेले लंडनला : शासकीय पैशाचा अपव्यय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आपल्या विविध उपक्रमांनी कायमच चर्चेत असते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *