Breaking News

सुनावणीत वकीलाने न्यायाधिशावर फेकले चप्पल : गुन्हा दाखल

Advertisements

आगर माळवा येथे एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान वकिलाला राग अनावर झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रागाच्या भरात त्याने केलेले कृत्य हे न्यायालयाचा अवमान करणारे आहे. न्यायालयीन सुनावणीवेळी त्याने थेट न्यायाधीशाच्या दिशेने चप्पल फेकले. या संपूर्ण प्रकारात न्यायाधिशांना दुखापत झाली आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणातील वकीलास सरकारी कामात अडथळा आणण्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

अमर उजाला या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश येथील आगर माळवा येथे ही घटना सोमवारी (दि. २२) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील संबंधित वकिलाचे नाव नितीन अटल अस आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ते इतके संतप्त झाले की त्यांनी न्यायाधीशांवर चक्क पायातले बूट फेकले. या कृत्यांनतर संबंधित वकील घटनास्थळावरून पळून गेले. वकिलाने केलेल्या हल्ल्यात न्यायाधीशांच्या कानाला दुखापत झाली आहे.

Advertisements

आगर पोलिस ठाण्यात एका सरकारी कर्मचारीने याबाबत एफआयआर दिली आहे. आगर येथील प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांचे पत्र पोलिसांसमोर सादर केले. यासोबत अजय जाटव आणि वकील कौसर खान यांच्या प्रमाणित साक्षीची कागदपत्रेही जोडण्यात आली आहेत. या आधारे पोलिसांनी नितीन अटल यांच्या विरोधात आयपीसी कलम ३३२, ३५३, २९४ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

युवती को बनाया हवस का शिकार? अब छोटी बहन पर बुरी नजर : क्या है मामला?

युवती को बनाया हवस का शिकार? अब छोटी बहन पर बुरी नजर : क्या है …

नागपूर : खापरखेडा बिजलीघर बना शराबियों और अय्याशियों का अड्डा! नॉनवेज पार्टी, नशे में धुत मिले कर्मचारी

नागपूर : खापरखेडा बिजलीघर बना शराबियों और अय्याशियों का अड्डा! नॉनवेज पार्टी, नशे में धुत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *