Breaking News

शिवसेना युवासेना प्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या

Advertisements

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर यांची गुरुवारी रात्री 9:30 वाजता च्या दरम्यान हत्या करण्यात आली. ही हत्या चंद्रपूर येथील तुकूम परीसरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला करण्यात आली.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वझरकर हे आज रात्री 9:00 वाजताच्या सुमारास अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला उभे होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात वझरकर गंभीर जखमी झाले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Advertisements

वझरकर यांची हत्या नेमकी का करण्यात आली याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

वझरकर हे चंद्रपूर शहरातील शिवसेना युवासेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. ते शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होते. त्यांच्या हत्येने चंद्रपूर शहरात खळबळ माजली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

उमेदवार आणि निवडणूक चिन्ह कोणते?गडचिरोलीतील नक्षलग्रस्त दुर्गम भागातील आदिवासींचा सवाल

पुर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदार संघात 19 एप्रिलला मतदान होत आहे. या पाच पैकी गडचिरोली …

नगरीय प्रशासन मंत्री कैलाश विजयवर्गीय के करकमलों लोकसभा चुनाव संकल्प-पत्र का विमोचन

नगरीय प्रशासन मंत्री कैलाश विजयवर्गीय के करकमलों लोकसभा चुनाव संकल्प-पत्र का विमोचन   टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *