Breaking News

अमरावती-यवतमाळ मार्गावर भीषण अपघात : चार ठार, १० जखमी

Advertisements

अमरावती-यवतमाळ मार्गावर नांदगाव खंडेश्‍वर नजीक शिंगणापूर येथे सिमेंट कॉंक्रिट मिक्‍सर ट्रकने टेम्‍पो ट्रॅव्‍हलरला धडक दिल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात चार तरूणांचा जागीच मृत्‍यू झाला, तर १० जण गंभीररीत्‍या जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी घडला. जखमींवर येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय आणि खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व तरूण अमरावतीहून यवतमाळ येथे एका क्रिकेट स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी जात होते.

Advertisements

श्रीहरी राऊत, आयुष बहाळे, सुयश अंबर्ते, संदेश पाडर अशी मृत तरूणांची नावे आहेत. येथील रुक्मिणी नगर आणि रवी नगर परिसरात राहणारे १४ ते १५ तरूण यवतमाळ येथे आयोजित क्रिकेट सामन्‍यासाठी टेम्‍पो ट्रॅव्‍हलरने जात होते. सकाळी नऊ वाजताच्‍या सुमारास शिंगणापूर फाट्यानजीक एका भरधाव सिमेंट कॉंक्रिट मिक्‍सर ट्रकने टेम्‍पो ट्रॅव्हलरला धडक दिली. अपघातात चार तरूणांना जागीच मृत्‍यू झाला, तर १० जण जखमी झाले.

Advertisements

जखमींना नांदगाव खंडेश्‍वर येथील रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. त्‍यातील पाच गंभीर जखमींना अमरावती येथील रुग्‍णालयात हलविण्‍यात आले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिक्षा सुनावताच कोर्टातच कोसळला क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेन्ट्रेटर मायकल स्लॅटर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जवळपास डझनभर …

रेतीच्या ट्रॅक्टरने कोतवालास चिरडले : घटनास्थळीच…!

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल विभागाच्या कोतवालास ट्रॅक्टरने चिरडले. या कोतवालाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *