Breaking News

‘वाट बघतोय रिक्षावाला..’मधील अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोट

Advertisements

‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे मराठी अभिनेत्री मानसी नाईक घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या नृत्यशैलीबरोबरच अभिनयाचही सर्वत्र कौतुक केलं जातं. गेल्या वर्षभरापासून मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. पण, त्यानंतर वर्षभरातच मानसीने पतीपासून विभक्त होत असल्याची माहिती दिली होती. आता अधिकृतपणे तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

Advertisements

 

Advertisements

मानसी व प्रदीप आता अधिकृतरित्या वेगळे झाले असून याबाबत दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे. अभिनेत्रीने या संपूर्ण प्रवासाबद्दल सविस्तरपणे तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

 

काय म्हणाली मानसी नाईक

 

“मनोरंजन विश्वात कार्यरत असणाऱ्या कोणत्याही कलाकाराचं आयुष्य हे प्रायव्हेट नसतं. गेल्या वर्षभरात मी अनेक मुलाखतींमध्ये माझं मन मोकळं केलं आहे. सगळ्या मुलाखती, लाइव्ह सेशनमध्ये मी ताठ मानेनं माझं मत मांडलंय. मी कधीच खोटं बोलत नाही. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला माझा घटस्फोटाचा प्रवास आता संपलेला आहे. अधिकृतरित्या मी आता वेगळी झालेली आहे.”

 

तसेच “या संपूर्ण प्रवासात मी अजिबात हरले नाही. उलट मी आणखी जिद्दीने यापुढचा प्रवास करणार आहे. सगळ्यांचा कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सामान्य माणसांपेक्षा फार वेगळा असतो. पण, आम्ही सुद्धा माणूस असतो हे कधीही विसरू नका. आमच्याकडून देखील चुका होता पण, या चुका सुधारता येऊ शकतात. भूतकाळातील सर्व गोष्टींना पूर्णविराम देत मी एक नवीन प्रवास आनंदाने सुरू करत आहे.”

“आज हक्काने तुम्हा सर्वांचे मी आभार मानते. या प्रवासात तुम्ही मला नेहमी साथ दिली. आता पुन्हा एकदा मी नव्याने जगायला सुरुवात करतेय…त्यामुळे तुमची साथ आणि तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप मोलाचा आहे.” असं मानसी नाईकने सांगितलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

स्तनाच्या कर्करोगाच्या वेदनादायक आजाराशी झुंजणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रिया

स्तनाच्या कर्करोगाच्या वेदनादायक आजाराशी झुंजणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: ९८२२५५०२२०   मुंबई. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील …

राज कपूर की आंखें नम हुईं, पंकज उधास ने गाया ‘चिट्ठी आई है’ चिट्ठी

राज कपूर की आंखें नम हुईं, पंकज उधास ने गाया ‘चिट्ठी आई है’ चिट्ठी टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *