Breaking News

150 तोळं सोनं चोरी करून अभिनेत्री गेली गोव्याला फिरायला

Advertisements

तेलुगू चित्रपटसृष्टीतील नवोदित अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सौम्या शेट्टीला वैझाग शहर पोलिसांनी अटक केली आहे. सोनं चोरीच्या आरोपाखाली सौम्याला अटक करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली होती. दोंडापार्ती याठिकाणी बालाजी मेट्रो रेसिडेन्सीमध्ये ही चोरी झाली. त्यानंतर मालक प्रसाद बाबू यांनी तब्बल 150 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान पोलिसांनी अकरा जणांवर संशय व्यक्त केला. त्यापैकी नंतर तीन संशयितांची चौकशी केली आणि यामध्ये सौम्याचाही समावेश होता.

Advertisements

विशाखापट्टणममधील निवृत्त पोस्ट कर्मचाऱ्याच्या घरात सौम्याने 150 तोळं सोन्याची चोरी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्याने चार वेगवेगळ्या प्रकरणातून ही चोरी केली आणि त्यानंतर गोव्याला फिरायला गेली. प्रसाद बाबू यांच्या घरात सौम्या बाथरुमद्वारे शिरली. तिथून बेडरुममध्ये जाऊन तिने एक किलोचं सोनं चोरलं आणि त्यानंतर गोव्याला पळाली. अटकेनंतर सौम्याने तिच्या गुन्ह्याची कबुली दिली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार

उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नवी मुंबईतील नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक …

शिक्षा सुनावताच कोर्टातच कोसळला क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेन्ट्रेटर मायकल स्लॅटर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जवळपास डझनभर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *