Breaking News

मुख्यमंत्री शिंदेनी काँग्रेस आमदाराला मुंबईला बोलविले? BJP मध्येही हालचाली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर सध्या प्रचंड बैठकांचं सत्र सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान आता तोंडावर आलं आहे. महिन्याभरात देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांचा समावेश आहे. असं असलं तरी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मतदानाचा पहिला टप्पा जवळ आला आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा, त्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरणं, त्या अर्जांची छाननी आणि नंतर उमेदवारी निश्चित होणं, त्यापुढे प्रचाराची रणधुमाळी या सर्व गोष्टी होणार आहेत. पण मतदानाला अवघा एकच महिना शिल्लक आहे. रामटेकच्या जागेचा तिढा कायम आहे. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांना शिंदे गट उमेदवारी देऊ शकते.गुरुवारी याबद्दल चर्चा झाली असून पारवे यांनाही बोलविण्यात आले असल्याचे समजते.

 

अजून उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे प्रचारासाठी कदाचित वेळ कमी पडू शकतो. याच गोष्टीची धाकधूक आता भाजप आणि मित्रपक्षांनादेखील पडताना दिसत आहे. त्यामुळे भाजप आता पुढच्या 24 तासात महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्याची चिन्हं आहेत. यासाठी देवेंद्र फडणवीस यांची पक्षातील हायकमांडसोबत ऑनलाईन बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजप हायकमांड आणि फडणवीसांची फायनल ऑनलाईन बैठक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे. ही यादी येत्या 24 तासात येण्याची शक्यता आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑनलाईन चर्चा करणार आहेत. दिल्लीतील सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची आजच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑनलाईन चर्चा होण्याची शक्यता आहे.

About विश्व भारत

Check Also

कौन से हैं वो 3 राज्य, जो चुनावों से पहले BJP के लिए बन गए बड़ा सिरदर्द?

कौन से हैं वो 3 राज्य, जो चुनावों से पहले BJP के लिए बन गए …

महाराष्ट्र तक फैली है शरद पवार की संपत्ती : शेयर्स में की सबसे मोटी रकम इन्वेस्ट

महाराष्ट्र तक फैली है शरद पवार की संपत्ती : शेयर्स में की सबसे मोटी रकम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *