मराठवाड्यापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत तसेच, मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय असल्याची माहिती आहे. यामुळे ढगाळ आकाशासह राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान होत आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.
धुळे (४२), मालेगाव (४२), जळगाव (४१.७), सोलापूर (४१.२), वाशीम (४०.६), ब्रह्मपुरी (४०.५), अकोला (४०.४), बीड (४०.१), वर्धा (४०.१), अमरावती (४०) या ठिकाणांवरील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक होते. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.