Breaking News

नागपूर लोकसभा निवडणुकीतील मतदान कमी झाल्याचा मुद्दा नागपूर हायकोर्टात!

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी पाच लाखांच्या अंतराने जिंकून येतील, असा दावा भाजपतर्फे केला जात होता. मतमोजणीला महिना शिल्लक असताना भाजपतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. यंदाचं मतदान गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी म्हणजे 54.30 टक्के झालं आहे. ही बाब भाजपने गांभीर्याने घेतली आहे. जिथे गडकरींचा पाच लाखावर मतांनी विजय होईल, असे दावे केले जात होते, त्याच नागपूरातील लाखो मतदारांची नावे मतदारयादीतून गहाळ झाली आणि परिणामी लाखो लोक मतदान करू शकले नाही. आता त्या मुद्द्यावरच भारतीय जनता पक्षाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पक्षाला आधी देण्यात आलेली मतदार यादी पेक्षा फार वेगळी मतदार यादी मतदानाच्या दिवशी नागपुरातील मतदान केंद्रांवर देण्यात आली होती आणि या बूथवर पुरविण्यात आलेल्या यादीत खूप चुका होत्या, खूप नावे गहाळ होती, असा थेट आरोप विदर्भ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेत पूर्व नागपूर येथील आमदार कृष्णा खोपडे यांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना केला आहे. मतदार यादीतील चुकांमागे सरळसरळ राजकीय षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप देखील त्यांनी केला आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपूर जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस : महसूल, पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध कारणीभूत

अवैध वाळू उत्खनन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, नागपूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांचे प्राबल्य …

जिल्हाधिकारी खासदाराच्या पत्राची दखलच घेत नाही

गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी खासदाराने पत्र दिल्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *