नागपुरात एकाच भूखंडाची दोघांना विक्री : आमदार म्हणतात, नागपुरात भूखंड माफियाचे ‘हौसले बुलंद’

नागपुरात एकाच भूखंडाची दोघांना विक्री करून भूविकासकाने एका महिलेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी निर्मला श्रीकृष्ण मातीखाये (५९) रा. गणेशपूर, भंडारा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. प्रकाश संतोष मोहोड (४४) रा. झिंगाबाई टाकळी असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी प्रकाश मोहोड याने गोधनी रोडवर सफल लॅन्ड डेव्हलपर्स नावाने कार्यालय उघडले होते. निर्मलाचे पती श्रीकृष्ण हे महावितरण कंपनीत काम करीत होते. १९९६ मध्ये श्रीकृष्ण आणि निर्मला यांनी सफल लॅन्ड डेव्हलपर्सकडून मौजा गोधनी रेल्वे परिसरात भूखंड खरेदी केला होता. आरोपी मोहोडने त्यांना त्याच वेळी रजिस्ट्री आणि ताबाही दिला होता. त्यानंतरही २००९ मध्ये मोहोड याने तोच भूखंड अजनीच्या रेल्वे क्वॉर्टर येथे राहणाऱ्या सय्यद जावेद अली यांना विकला. ग्रामीणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांना विक्रीपत्र करून दिले. जावेद यांनी भूखंड आपल्या ताब्यात घेतला. काही दिवसांपूर्वी निर्मला नागपुरात आल्या. जावेदला विचारपूस केली असता सर्व प्रकार समोर आला. त्यांनी प्रकरणाची तक्रार मानकापूर पोलिसात केली. तपासानंतर पोलिसांनी मोहोड विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

बिल्डरनेही लावला चुना

अशाच प्रकारचे दुसरे प्रकरण हुडकेश्वर ठाण्यांतर्गत ही पुढे आले आहे. पोलिसांनी शैलेश रामराव सुपलकर (३०) च्या तक्रारीवरून आरोपी बिल्डरविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. प्रमोद वासुदेव हर्षे (रा. आकाश पॅलेस अपार्टमेंट, अयोध्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी प्रमोदने आकाश पॅलेस येथील सदनिका नरेंद्र भांडारकर नावाच्या व्यक्तीला विकला होता. काही दिवसांनी त्याच फ्लॅटचा सौदा त्याने शैलेश याच्याशीही केला. १९ एप्रिल २०२४ रोजी विक्री करारनामा करून देत शैलेशकडून ७ लाख रुपये घेतले. सदनिकेची कागदपत्रे तपासली असता फसवणूक झाल्याचे समजले. त्याने प्रमोदला पैसे परत मागितले असता त्याने नकार दिला. शैलेशने घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी आरोपी प्रमोदवर गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे

About विश्व भारत

Check Also

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील १८ उमेदवारांचे अर्ज रद्द : काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा …

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *