रामटेक बंगल्यात जे राहिले ते मुख्यमंत्री झाले आहेत.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर हा बंगला चर्चेत आला आहे. मात्र रामटेक बंगल्यात जे जे राहिले ते ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचल्याचा दावा माजी मंत्री दीपक केसरकरांनी केला. शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले असं सांगत आपणही मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर झेप घेऊ,असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
