आरोग्य क्षेत्रात एक मोठी घटना घडलेली आहे. जीबी सिंड्रोम या दुर्धर आजाराने बारामतीतील एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. किरण राजेंद्र देशमुख (वय २०) असे या तरुणीचे नाव असून, पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिच्या प्राणज्योती मालवली. तीन आठवड्यांपूर्वी किरण पुण्यातील सिंहगड परिसरात राहत असताना तिला त्रास जाणवू लागला. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिला जुलाब व अशक्तपणा जाणवू लागल्याने तिला बारामती येथे आणण्यात आले. सुरुवातीला तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, लक्षणे गभीर होत गेल्याने डॉक्टरांनी तिला पुण्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. पुढील तपासणीनंतर तिला गिलेन बॅरे सिंड्रोम (GBS) असल्याचे निदान झाले. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या उपचारांना यश न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
