Breaking News

रक्तरंजित होळी : आईसोबत जवळीक केल्याने खून

संशय ही गुन्ह्याची जननी ठरत असल्याचे प्रकार नवे नाहीत. त्यातून मारामारी, शिवीगाळ व प्रसंगी खून करण्याचे प्रकार होत असतात. हा त्यातीलच गुन्हा. आरोपी अटकेत व श्वविच्छेदन सूरू. आर्वी तालुक्यातील खरागना पोलीस ठाण्यात तक्रार आज दाखल झाली आहे. कारंजा तालुक्यातील दाणापूर येथे खाजगी नौकरी करणाऱ्या ३५ वर्षीय दिनेश दिलीपराव कांबळे याने ही तक्रार केली आहे. तळेगाव येथील अरवली एक्स्प्लॉसिव्ह येथे तो हेल्पर म्हणून काम करतो. होळीच्या रात्रीच्या त्याने आई वडील व भावासोबत जेवण घेतले. त्यानंतर लहान भाऊ धम्मदीप हा आपल्या मोटर बाईकने वर्धेला निघून गेला. त्यानंतर मी व आई घरात जाऊन झोपलो. माझे वडील दिलीपराव कांबळे हे घराबाहेर पोर्च मध्ये बाजेवर झोपले होते. त्यानंतर रात्री अंदाजे १२ वाजता दरम्यान घराबाहेर आवाज आला. त्यामुळे मी दार उघडून बाहेर पाहले. त्यावेळी वडील हे बाजेवर उताणे पडल्याचे पाहले. त्यावेळी शुभम लिंगे हा लाकडी टेनप्याने माझ्या वडिलांच्या डोकयावर मारत असल्याचे दिसून आले. मला पाहून त्याने मला मारण्याचा प्रयत्न केल्याचे पाहून मी घरात घुसलो व आईस ही माहिती दिली. तेव्हा काका घराबाहेर आल्याने मी दरवाजा उघडून बाहेर येत असतांना शुभम टोणपे घेऊन माझ्या काकावर धावला.

 

म्हणून प्रतिकार करीत माझ्या काकाने त्याला डोक्यावर हाणले. त्यानंतर त्याचे दोन्ही भाऊ सौरव व संकेत हे त्याच्या घरून माझ्याकडे आले. शुभम हा माझ्या काकाला मारण्यासाठी जात असल्याने मी शुभम यांस पकडून ओढले. तेव्हा सौरव व संकेत यांनी ओढल्याने मी पडलो. त्यावेळी माझ्या घराजवळ सविता मेंढे, जालोधार मेंढे, शुभांगी कांबळे, पदमाबाई येसाणकर, वंदना कांबळे, शेषराव कांबळे, राजेंद्र कांबळे, धर्मेंद्र कांबळे, राहूल खैरकार हे गोळा झाले होते. २०१७ साली शुभमची आई मनिषा लिंगे हिने माझे वडिलांविरुद्ध विनयभंगाची केस केली होती. ती केस अद्याप कोर्टात सूरू आहे. तरीही माझे वडील कधी कधी मनिषा लिंगे हिच्या सोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करीत असल्याची शुभम लिंगे याची शंका असल्याने त्याने माझे वडील दिलीप बकरामजी कांबळे ६२ यांचा खून केला आहे, ही माझी तक्रार आहे असे दिनेश कांबळे याने तक्रार दिली.

यासोबतच होळीस वर्धा जिल्हा पोलिसांनी कोट्यावधी रुपयाची दारू जप्त करीत विक्रीस अटकाव केला. एकूण १९ पोलीस ठाण्यात ८७ केसेस दाखल झाल्यात. तर ९३ आरोपीकडून ६५ लाख ३३ हजार रुपयावर किमतीची दारू जप्त करण्यात आली. सर्वाधिक वर्धा शहर व समुद्रपूर येथून अवैध दारू जप्त करण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

सैकडों महिलाओं का सुहाग उजाडने वाला दाऊद इब्राहिम पाकिस्तान में!

सैकडों महिलाओं का सुहाग उजाडने वाला दाऊद इब्राहिम पाकिस्तान में! टेकचंद्र सनोडिया शास्त्रा: सह-संपादक रिपोर्ट …

जमीन जायदाद के विवाद में किसान की मौत

जमीन जायदाद के विवाद में किसान की मौत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिंदवाड़ा।09.05.2025 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *