Breaking News

सोन्याच्या दरात घसरण : १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Advertisements

सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज शनिवारी सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

Advertisements

 

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत?

Advertisements

 

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २६ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २५ कॅरेट सोन्याचा दर ९५,२७० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८७,३३१ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९६,६८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९६७ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

 

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७,१६६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,०९० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,१६६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,०९० रुपये आहे.

नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,१६६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,०९० रुपये इतका आहे.

नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,१६६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,०९० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

 

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

 

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

स्वदेशी अपनाओ और विदेश हटाओ के उद्देश्य के अनन्य लाभ

स्वदेशी अपनाओ और विदेश हटाओ के उद्देश्य के अनन्य लाभ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   प्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *