Breaking News

‘भाजपा बाटलेला पक्ष, आयुष्य फोडाफोडीत गेले’: महाराष्ट्रातील मंत्र्याच्या विधानाने खळबळ

Advertisements

भाजपा हा बाटलेला पक्ष आहे, त्यांना फोडाफोडी करण्याशिवाय काहीच येत नाही’, असे विधान राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. सिन्नर नगरपरिषदेच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत असताना त्यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपा पक्षाबद्दल केलेले विधान वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अनेकदा कोकाटे यांनी केलेल्या विधानामुळे ते वादग्रस्त ठरले होते. विधीमंडळातील त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे कृषी खाते काढून घेण्यात आले होते.

Advertisements

माणिकराव कोकाटे काय म्हणाले?

Advertisements

सिन्नर येथील सभेत बोलत असताना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे राजकारण सुरू आहे त्यावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, “मी महाराष्ट्रात फिरत असताना पाहतो की, संपूर्ण राज्यात महायुतीमध्येच आपापसात लढाई सुरू आहे. निवडणुकीत संघर्ष हा युतीमध्येच आहे. विरोधी पक्ष तर कुठेच दिसत नाही. आपल्याकडे थोडासा उबाठा दिसतो. तोही बाटलेला आहे. भाजपा तर पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे. भाजपाचे काहीच राहिलेले नाही. इकडून फोड, तिकडून फोड, फोडाफोडीमध्ये त्यांचे आयुष्य चालले. त्यांचे बिचारे जुने कार्यकर्ते घरी बसले आहेत.”

माणिकराव कोकाटे यांनी केलेली अनेक विधाने आजवर वादग्रस्त ठरली. “एखादा भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण इथे आम्ही फक्त एका रुपयात पीक विमा देतो, तरीही काही लोक त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात,” असे विधान त्यांनी कृषी मंत्री असताना केले होते. या विधानावर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर पक्षानेही त्यांना समज दिली होती.

डिसेंबरच्या विधानानंतर रविंद्र चव्हाण यांचं आणखी एक विधान; कुणाला डिवचलं?

या विधानानंतर माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जावर भाष्य केले होते. “तुम्ही कर्ज घेता आणि मग ते पाच-दहा वर्षं भरत नाही, कारण तुम्हाला वाटते सरकार ते माफ करेल. शेतकरी आता शेतीमध्ये गुंतवणूक करत नाहीत. सरकार ड्रिप सिंचनापासून ते तलाव आणि पाईपलाईनपर्यंत सर्व गोष्टींसाठी मदत देते”, असे विधान कोकाटे यांनी केले होते.

मोबाइलवर गेम खेळल्याचा आरोप

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाइलवर गेम खेळत होते, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मध्यंतरी केला होता. तसा व्हिडीओच रोहित पवार यांनी एक्सवर शेअर केला होता. त्यानंतर विरोधकांनीही कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकरणानंतर त्यांच्याकडील कृषी खाते काढून त्यांना क्रीडा खाते देण्यात आले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *