Breaking News

GDP आकडेवारी: मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली, विदेशी प्रसारमाध्यमांची टीका

Advertisements

केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी जीडीपीचे आकडे जाहीर केल्यानंतर देशभरात चर्चेला उधाण आलं. उणे 23.9 या दरामुळे पंतप्रधान मोदींवर विदेशी प्रसारमाध्यमांनी जोरदार टीका केली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची 1996 नंतरची ही सगळ्यात ऐतिहासिक घसरण आहे असं मानलं जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि देशभरात लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन यामुळे ही स्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे.

Advertisements

जगातील वेगाने मोठं होऊ पाहणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश आहे. म्हणूनच जीडीपीच्या नवी आकडेवारी आणि त्याचं विश्लेषण असं सर्वसमावेशक वृत्तांकन विदेशी प्रसारमाध्यमांनी केलं आहे.

Advertisements

भारतीय अर्थव्यवस्थेची विक्रमी घसरण अशा शब्दात सीएनएन या अमेरिकेतील वाहिनीने म्हटलं आहे. कॅपिटल इकॉनॉमिक्सचे शीलन शाह सांगतात, यामुळे आणखी प्रमाणात बेरोजगारी, कंपन्यांचं अपयश, बिघडलेलं बँकिंग सेक्टर हे प्रकर्षाने समोर येईल. ज्याचा परिणाम गुंतवणूक आणि मागणी-पुरवठा साखळीवर होईल.

जपानमधल्या अर्थविषयक वृत्तपत्र निकेई एशियन रिव्ह्यूमध्ये भारतीय वित्त आयोगाचे माजी कार्यकारी संचालक रितेश कुमार सिंह यांनी लेख लिहिला आहे. पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली अशा परखड शब्दात त्यांनी टीका केली आहे.

व्यापाराला अनुकूल अशी प्रतिमा असतानाही अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्यात त्यांना अपयश आलं आहे. 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचं स्वप्न आता साकार होताना दिसत नाही.

शातल्यागळ्यांत आधुनिक औद्योगिक शहराची पार्श्वभूमी असणाऱ्या मोदी यांनी अर्थव्यवस्था सुधारण्याचं आश्वासन दिलं होतं. दरवर्षी 1.2 कोटी नोकऱ्या निर्माण होतील असंही सांगितलं होतं. सहा वर्षं आशावाद निर्माण केल्यानंतर आता अर्थव्यवस्था जर्जर झाली आहे.

चार दशकांनंतर जीडीपीची एवढी मोठी घसरण झाली आहे. बेरोजगारी टोकाला जाऊन पोहोचली आहे. विकासाचे आधारस्तंभ, मागणी-पुरवठा साखळी, गुंतवणूक ठप्प झालं आहे. मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे ताकद नाही. अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळता न येणं ही एकमेव चूक नाही तर भ्रष्टाचार संपवू या घोषणेचेही पुढे फार काही झालं नाही.

मोदी यांनी विनाशकारी नोटबंदीची घोषणा केली होती, ज्याचा उद्देश काळं धन संपुष्टात आणणं हा होता. त्याने अराजकता निर्माण झाली. या योजनेने लाखो शेतकरी, असंख्य छोटे व्यापारी तसंच उद्योजकांचं प्रचंड नुकसान झालं. मात्र मोदी समर्थकांच्या मते हे सगळं अल्पकालीन आहे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोठ्या लढाईत हे पाऊल फायदेशीर ठरेल.

अर्थव्यवस्था रसातळाला जाण्याची आणखी काही कारणं म्हणजे जीएसटी, एफडीआय, 3600 उत्पादनांवर आयात शुल्क वाढवणं तसंच पंतप्रधान मोदी यांचा ठराविकच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर विश्वास ही आहेत.

अमेरिकेतीलन्यू टाईम्सने भारताच्या  जीडीपीसंदर्भातीलबा दिली आहे. कोरोना संकटामुळे डळमळलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताची स्थिती खराब आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था यंदाच्या तिमाहीत 9.5 टक्क्यांनी घसरली आहे. जपानची अर्थव्यवस्था 7.6 टक्क्यांनी घसरली आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

जानिए यहां सट्टेबाज एक्सपर्ट करते हैं लोकसभा चुनाव के परिणाम की भविष्यवाणिया

जानिए यहां सट्टेबाज एक्सपर्ट करते हैं लोकसभा चुनाव के परिणाम की भविष्यवाणिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

ED के संकट से जूझ रहे कांग्रेसियों को बचाएगी BJP?

ED के संकट से जूझ रहे कांग्रेसियों को बचाएगी BJP?   टेकचंद्र सनोडिया शास्त्री:   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *