ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णालय तालुकास्थानी प्रारंभ करण्याची प्रशासनाकडे केली मागणी.
वर्धा:जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- मागील 10-15 दिवसापासून कोविड-19 चे रुग्ण वर्धा जिल्हयात झपाटयाने वाढत आहे. संपुर्ण जिल्हयात सावंगी व सेवाग्राम येथे कोविड सेंटर सेवा उपलब्ध असल्याने समस्त वर्धा जिल्हयातील पाॅझेटीव्ह रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातुन सावंगी व सेवाग्राम येथे अनेक मोठा पल्ला गाठून उपचार करावे लागतात परंतु जिल्हा प्रशासनाने आपल्या जिल्हयात उपलब्ध असलेल्या ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे आवश्यक पुर्तता करुन छोटे छोटे कोविड सेंटर तालुकास्थानी उपलब्ध करुन दिल्यास संपुर्ण वर्धा जिल्हयातील रुग्णांना दिलास मिळेल याकरिता वर्धा जिल्हा प्रशासनाने उचित कार्यवाही करावी अशी मागणी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी केली.
कोविड-19 चा रुग्ण जिल्हयातील कुठल्याही टोकावरुन थेट वर्धा येथे येत असल्याने रुग्णवाहिका व इतर वेद्यकीय खर्च मोठया प्रमाणात होत आहे. सोबतच रुग्णांच्या नातेवाईकांनादेखील सतत वर्धा शहराच्या चकरा माराव्या लागतात या सर्व विषयाचा सखोल विचार करुन छोटे कोविड सेंटर तालुकास्थानी उपलब्ध करुन दिल्यास वर्धा परिसरात होणारी गर्दी व वर्दळ कमी होईल व रुग्णांना तालुकास्थानी आपल्या घराजवळ उपचाराची सुविधा उपलब्ध होण्यास सहकार्य होईल असे मत यावेळी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
केन्द्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना घरीच उपचार घेण्यासंबधी निर्णय घेण्यात आलेला आहे. या महत्वपुर्ण सुचनेचे देखील जिल्हा प्रशासनाने पालन करणे गरजेचे आहे, सोबतच वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा मुख्यालयी असलेल्या कोविड रुग्णालयाचे विकेन्द्रीकरण करुन तालुकास्थानी करणे हा एक महत्वपुर्ण निर्णय रुग्णांच्या हितार्थ घेतल्यास अनेकांना मदत होईल व प्रशासनाचा देखील ताण कमी होईल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.
विश्वभारत News Website