Breaking News

सिरपूर येथे जनावरांना लसीकरण

Advertisements

नेरी(दि.3सप्टेंबर):- देशात कोरोना चा कहर सुरू असताना मानव संकटात सापडला असून आता पाळीव प्राण्यावरही लँपी नावाच्या आजाराने थैमान घातले असून तालुक्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्ग रोग लंपीने शेतकऱ्यांची झोप उडवलेली आहे.ऐन कामांच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झाला आहे.लपी हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे एका जनावरांपासून अनेक जनावरांना होतं आहे. याच पार्श्वभूमीवर जनावरांचे व शेतक-यांचे नुकसान होऊ नये या करीता नेरी परीसरात जनावरांना वाढत असलेल्या लंपी रोगांवर मात करण्यासाठी शिरपूर येथे पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Advertisements

या शिबिरात गावातील संपूर्ण जनावरांना लसीकर करण्यात आले आणि या रोगाबद्दल पशु मालकांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ देवराव जांभुळे, पशुधन पर्यवेक्षक डॉ दुधराम कावळे,उपस्थित होते तसेंच ग्रामीण कुर्षी कार्यानुभव कुर्षी महाविद्यालयांचे विद्यार्थी निखिल राहाटे, किशोरी निळकंट लोनबले यांनी लसीकरण आणि मार्गदर्शन केले. या लसीकरण कार्यक्रमाला पशुपालक गावकरी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील कॉटन मार्केटमध्ये रेल्वे पुलाखालून वाहतूक बंद

नागपुरातील लोहा पुलाचे बांधकामामुळे कॉटन मार्केट चौकाकडून सीताबर्डीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे कॉटन मार्केट …

खेत में मगरमच्छ देखते ही मची खलबली

खेत में मगरमच्छ देखते ही मची खलबली   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   जांजगीर। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *