Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कामात ऐतिहासिक बौद्ध लेणी जमीनदोस्त

Advertisements

🔸पँथर ऑफ सम्यक योद्धा सह पक्ष व संघटना आक्रमक

नवी मुंबई(दि.3सप्टेंबर):-आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण कामात सिडको व विमानतळ प्राधिकरण प्रशासनाने बौद्ध लेणी चे संवर्धन करन्या येवजी जमीनदोस्त करून प्राचीन ऐतिहासिक वारसा संपवण्याचे कुटील कारस्थान रचले आहे, यामुळे पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे.

Advertisements

ओ बी सी व आंबेडकरी चळवळतील नेते राजाराम पाटील यांनी लेणी बचाव सुरू केलेल्या आंदोलनाची धुरा पँथर ऑफ सम्यक योद्धा या संघटनेने घेतली असून पूज्य भदंत शिलबोधी, पूज्य भदंत सन्घप्रिय पँथर डॉ राजन माकणीकर, पँथर श्रावण गायकवाड यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचिती मिळत असून सिडको प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

Advertisements

भाद्रपद पौर्णिमेच्या औचित्य साधून विश्वाच्या शांतीसाठी व वाघिवळीवाडा बौद्ध लेणी बचावासाठी आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध वंदनेला पोलीस प्रशासनाने अटकाव आणून लेणी पर्यंत आंदोलकांना जाण्यास मज्जाव केला.समयी आंदोलनकारी व प्रमुखांनी पूज्य भदंत शिलबोधी यांच्या सूचनेला मान देऊन पोलिसांनी अडवलेल्या जागीच बौद्ध वंदना घेऊन विश्व शांतीसाठीं प्रार्थना केली व कार्यक्रम संपल्याचे घोषित केले.

पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदिशभाई गायकवाड यांनी 17 तारखेला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून लेणी बचाव हाच मूळ मुद्दा असल्याचे सांगितले. स्वाभिमानी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांनी कार्यक्रम स्थळाला भेट देऊन बौद्ध लेणी बचाव आंदोलनाला समर्थन करून या पुढे पक्षविरहित आंदोलन करू अशी ग्वाही मनोजभाई संसारे यांनी दिली.

आंदोलन लेणीं बचावासाठी असून बौद्ध जणतेंनी पुढाकार घेऊन लेणी चा बचाव करून देशाची संपत्ती व बौद्धांची संस्कृती वाचवावि असे आवाहन यावेळी राजाराम पाटील यांनी केले.पूज्य भदंत शिलबोधी यांनी राष्ट्राची येतिहासिक संपत्ती वाचविण्यासाठी माझे हेच जन्म काय तर येणारी सर्व जन्म लेणी गड व राष्ट्रीय स्मारकाच्या संवर्धनात जातील असा आशावाद प्रकट केला. सरकार, सिडको व पोलिस प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी नारेबाजी केली, पूज्य भदंत संघप्रिय यांनी बौद्ध वंदना व आशीर्वाद दिला.

कार्यक्रम यशसवीतेसाठी सचिन भूटकर, संतोष चौरे, संदीप जाधव, किरण चौरे यांनी अथक परिश्रम घेतले, लॉकडाऊन वाढीमुळे आणि पोलीस प्रशासनाच्या विनंतीमुळे आंदोलकांनी मनुष्यबळ व आंदोलनाचा प्रभाव सौम्य केला असला तरी शेकडो कार्यकर्ते उपस्तिथ होते, मात्र; लेणी संवर्धनासाठी संबंध भारतात आंदोलनाला व्यापक स्वरूप निर्माण होत असून पँथर ऑफ सम्यक योद्धा, दि बुध्दांज बोधी ट्री, सम्यक मैत्रेय फौंडेशन या संस्था लेणी बचावासाठी उच्च न्यायालयाची दारे ठोठावणार असल्याची माहीती विश्वसनीय सूत्रांकडून आली आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरच्या पारडी परिसरात रस्त्यावर पाणी, सर्वत्र अंधार

नागपुरातील पारडी परिसरात आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास काळोख पसरला. तसेच मुख्य रस्त्यावर सर्वत्र …

केंद्रीय ग्रह मंत्री अमित शाह ने दी उद्धव ठाकरे को चुनौति

केंद्रीय ग्रह मंत्री अमित शाह ने दी उद्धव ठाकरे को चुनौति टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *