Breaking News

राष्ट्रवादीचे एकनीष्ठ नेते माधव निर्मळांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – आप्पासाहेब तायडे

Advertisements

बीड(दि.8सप्टेंबर):-धनगर समाजाचे लढवय्या नेते तथा मा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारातील एकनिष्ठ नेते माधव निर्मळ यांना माजलगाव मतदार संघातुन विधानपरिषदेवर घ्यावे.
किल्ले धारूर तालुक्यातुन राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार मा.श्री. प्रकाश सोळंके यांचे खंदे समर्थक आणि गेल्या दोन पिड्या पासुन राजकारनामध्ये सक्रिय असनारा निर्मळ परीवार आहे. बीड जिल्ह्यामध्ये उद्योग उभारून उद्योग पती म्हणुन बहु मान मिळवनारे कै.अंबादासरावजी निर्मळ यांचे कुटुंब नाव लौकिक मिळवनारे कुटुंब आहे. जनसेवेचा वसा घेऊन तरुनाच्या हाताला काम आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणुन लोक त्यांच्याकडे कुतूहलाने पाहतात.

Advertisements

स्व.अंबादासजी निर्मळ यांनी राजकारनामध्ये बर्या पैकी जम बसवुन काहि स्थानिकच्या निवडनुका देखिल लढवल्या होत्या,परंतु त्यांना म्हनावे तसे यश आले नसले तरी त्यांनी राजकारन न सोडता जनतेची सेवा केली काँग्रेसच्या विचार सरणित घडलेले अंबादासजी निर्मळ कालांतरानेमा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांशी सलग्न होऊन राष्ट्रवादी या पक्षाच्या माध्यमातुन जनतेची सेवा करु लागले असता संकट समयी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाश्चात राजकिय जबाबदारीची व व्यवसायाचीधूरा, त्याच पाऊलावर पाऊल ठेऊन त्यांचे पाच पुत्र संभाळताना दिसत आहेत.

Advertisements

बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग धंदे उभारून अनेक कुटुंबांना रोजगार देन्याचे काम आज त्यांच्या माध्यमातुन दिसत आहे. त्यांच्या पाच पुत्रापैकी श्री. माधवराव निर्मळ यांनी राजकारनामध्ये आपले नाव केलेले असुन एक कुशल नेत्रुत्व सर्वसमावेशक व्यक्तिमत्व व संघटन कौशल्य असलेले नेत्रत्व म्हनुन पुढे येत आहे. ते धनगर समाजातुन असल्याने समाजाची वज्र मुठ आवळून गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकी मध्ये आपल्या समाजाची मते राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकन्यात मोठा हात आहे. धनगर समाज आज त्यांच्याकडे समाजाचा नेता म्हणून बघत आहे.

माजलगाव विधानसभेमध्ये रात्रिचा दिवस अन दिवसाची रात्र करून आमदार श्री प्रकाशदादा सोळंके यांना निवडुन आणन्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.आणि त्या वेळेश दादंनी देखिल आपले सरकार आले तर माधवराव निर्मळ यांना विधानपरिषधेवर संधी देण्याची शिफारस पक्षाच्या वरिष्ठाकडे करू हा शब्द धनगर समाज मेळाव्यात दिला होता. आता दादा आमदार असुन सरकार देखिल आघाडीचे असल्यामुळे माजलगाव मतदार संघातुन विधान परिषदेवर माधवराव निर्मळ यांना घेण्याची मागणी होत असुन पुर्वि पासुनच राष्ट्रवादीच्या विचार सरनीत घडुन त्यांच्या अंगी मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांची जडनघडन झाल्यामुळे व महाराष्ट्रातील धनगर समाजाचे मोठे नेते असल्यामुळे माजलगाव मतदार संघाच्या माध्यमातुन व जनतेच्या मागणीनुसार मा.श्री.माधवराव निर्मळ यांना विधानपरिषदेवर राष्ट्रवादीच्या कोट्यातुन आमदार म्हणुन घ्यावा अशी बीड जिल्ह्यातील धनगर समाजाची आपल्याकडे मागणी आहे.
आमची मागणी स्विकार करावी अशी मी आपनास कळकळीची विनंती करतो.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

सापामुळे दोन दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा बंद

विद्युत पुरवठा करणाऱ्या नदीवरील डीपीतील जनित्रात भला मोठा साप अडकून पडल्याने विद्यूत पुरवठा बंद झाला. …

नागपुरात वीज पडून 11 जणांचा मृत्यू : 1600 घरे उद्ध्वस्त

विदर्भातील नागपूर विभागात पूर आणि वीज पडून किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *