Breaking News

रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली आज ( मंगळवारी) अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागानं (एनसीबी) ही कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज रियाला अटक करण्यात आलं. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.

२८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले. त्यानंतर आता एनसीबीकडून रियाच्या अटकेची मोठी कारवाई होत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.

रिया अटकेसाठी होती तयार

प्रेम करणे गुन्हा असेल तर या गुन्ह्य़ासाठी कोणतेही परिणाम भोगण्यास रिया तयार आहे. निर्दोष असल्याने तिने अटक टाळण्याचा प्रयत्न केलेला नाही. ती अटकेसही सज्ज आहे, असं रियाचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले होते.

About Vishwbharat

Check Also

मामले में नया मोड : हनीमून पर कितने करोड में हुआ था करिश्मा कपूर का सौदा?

बॉलीवुड इंडस्ट्री एक ऐसी जगह हैं, जहां से आए दिन ऐसी खबरें सुनने को मिलती …

चित्रपटाची ऑफर नाकारुन झाल्या उपजिल्हाधिकारी

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *