Related Articles
खासदार रामदास तडस यांचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाला निर्देष
वर्धा: राष्ट्रीय महामार्ग क्र 753 सी अंतर्गत येत असलेला पुलगांव शहरातील रेल्वे गेट ते पुलगांव बाहयवळण रस्ता संपुर्ण पणे क्षतीग्रस्त झाला असल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत तसेच वर्धा जिल्हयातुन अमरावती तसेच वाशिम, बुलढाणा व जालना या दिशेने जाणारा हा प्रमुख महामार्ग आहे. या संबधीची गंभीर दखल घेत वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी पुलगांव शहराच्या बाहयवळण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देष भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाच्या संबधीत अधिका-यांना दिले आहेत.
जालना ते पुलगांव राष्ट्रीय महामार्ग क्र 753 सी चे दुरुस्तीचे काम लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे तसेच वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेले असुन हा महामार्ग वाहतुक योग्य राहण्याकरिता केन्द्रीय रस्ते वाहतुक महामार्ग मंत्रालयाने दुरुस्तीचे काम मंजूर केले असुन या अंतर्गत पुलगांव बाहयवळण रस्त्याचे तातडीने दुरुस्ती करावी याकरिता माझे प्रयत्न असुन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे खासदार रामदास तडस यांनी स्पष्ट केले.