वर्धा प्रतिनिधी :- गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच स्तरावरील व्यवसायावर मोठे आर्थिक संकट ओढवलेले होते.व नंतर जसेजसे लॉकडाऊन शिथिल करण्यात आले तसेतसे काही व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.परंतु बँड व्यावसायिकांना अजूनही पूर्णपणे परवानगी देण्यात आली नव्हती आणि जिल्यातील बँड व्यासाईकावर मोठे आर्थिक संकट ओढवलेले होते.त्याकरिता जनक्रांती सेनेच्या वतीने बँड व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी त्यांना आर्थिक मदत करावी अश्या इतर मागण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे निवेदने देण्यात आले होते, व त्याकरिता जनक्रांती सेनेच्या वतीने आंदोलने सुद्धा करण्यात आले होते.तसेच मागणी पूर्ण करण्यासाठी नियमित पाठपुरावा सुद्धा सुरू होता त्यांंच्या या परिश्रमाला यश येत आज जिल्हाधिकारी श्री विवेक भीमनवार यांनी पूर्ण क्षमतेने बँड व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे.व त्या संदर्भात आदेश सुद्धा निर्गमित केले आहे.परंतु शासनाने कोवीड -19 करीता वेळोवेळी निर्धारीत केलेले नियमांचे पालन करणे संबंधीतांवर बंधन कारक राहील असेही या आदेशात नमूद केले आहे.यासाठी जनक्रांती सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष सुशांत खडसे, उपजिल्हाध्यक्ष प्रसाद कोडगिरवार, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे.

जनक्रांती सेनेच्या पाठपुराव्याला यश : जिल्ह्यात पुर्ण क्षमतेने बँड व्यवसायाला परवानगी, जिल्हाधिकारी यांनी आदेश केले निर्गमित
Advertisements
Advertisements
Advertisements