देवळी: जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळायला हवे. चांगल्या आरोग्याची हमी देणे ही शासनाचे आद्य कर्तव्य आहे. शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळते, मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाण्याचाच पिण्यासाठी वापर करावा लागतो. त्यामुळे गावागावांत शुद्ध पाणी मिळावे, वाढते प्रदूषण आणि फ्लोराइडमुळे पिण्याचे पाणी अनेकांच्या जीवावर उठत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही शुद्ध पाणी मिळावे, यासाठी एटीएम व्दारा शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एटीम मशील उपलब्ध करुन देण्यात आली आहे तसेच 2024 पर्यंत जलजिवन मिशन प्रत्येक घरात पाईपलाईनव्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचा केन्द्रसरकारचा मानस असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.
आगरगांव व लोणी या ठिकाणी खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत जलशुध्दीकरण व एटीम मशीनचा लोकार्पन सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते व भाजपा जिल्हाध्यक्ष डॅा शिरीष गोडे अध्यक्षतेखाली संपन्न झाला, यावेळी जि.प.उपाध्यक्षा सौ. वैशाली ज. येरावार, प.स. देवळी सभापती सौ. कुसुम प्र. चैधरी, जि.प.सदस्य व माजी सभापती मुकेश भिसे, महामंत्री मिलींद भेंडे, उपसभापती प.स. युवराज खडतकर, जि.प.सदस्य सुनिताताई राऊत, जि.प. सदस्य मयुरी मसराम, जयंत येरावार, देवळी विधानसभाप्रमुख दीपक फुलकरी, तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे, गजानन राऊत, अरविंद झाडे, शिरपुरचे सरंपच रविन्द्र भाणारकर, मुरदगाव खोसेचे सरपंज गजानन हिवरकर, उपसरपंच गजानन कु-हाटकर, आगरगावंच्या सरपंचा विभाताई राऊत, उपसरंपच सौ. पुजाताई पंधरे, लोणी सरपंच वैभव श्यामकुवर व उपसंरपच सौ. मायाताइ तिरळे, मुरदगांवच्या सचित कु. तृप्ती गावंडे आगरगावच्या सचिव कु. किर्ती राऊत, लोणीच्या सचिव कु. प्रतिभा मरापे तसेच मुरदगांव (खोसे), आगरगांव व लोणी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.