चंद्रपूर :- उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा बावणे यांच 12 नोव्हेंबर ला अकाली निधन झाले.
आधी कोरोनाने त्यांना ग्रासले मात्र कोरोनाला झुंज देत त्या बाहेर पडल्या परंतु विविध आजारांनी त्यांना सोडले नाही त्यात त्यांचा मृत्यू नागपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये झाला.
अचानक आयुष्यातुन त्यांनी एकजिट मारली, त्यांच्या निधनाने मित्र, मैत्रिणी शोक सागरात बुडाले.
आयुष्यात अनेक संकटाचा सामना करीत सामाजिक क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.
12 डिसेंम्बरला स्थानिक आयएमए हॉल येथे पौर्णिमा बावणे यांचा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमात शहरातील अनेक गन्मान्य नागरिक, उत्कृष्ट महिला मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी राजेश सोलापन,विनोद पन्नासे ; दिनेश एकवनकार, जितेंद्र जोगड ,डॉ शर्मिला पोदार ,डॉ विध्या ताई बांगडे,, रत्नमाला बावणे, सविता कांबळे, नगरसेविका, शितल गुरनुले नगरसेविका, पुषा उराडे, नगरसेविका, अनुराधा हजारे नगरसेविका, साक्षी कार्लेकर, प्रा, स्नेहल बांगडे, आरिफा शेख, पूजा पडोळे, वैशाली साखरकर, जगदीश नंदूरकर, स्मिता रेभंनकर
सुषमा नगराडे सुवर्णा लोखंडे, रंजना मानुसमारे, सुवर्णा काबडे कविता जुमडे, कल्पना शिंदे , शुभांगी डोंगरवार प्रियंका चिताडे यांनी पौर्णिमा बावणे सोबतचे अनुभव कथन केले, त्यांचं कार्य, सामाजिक क्षेत्रातील भरारी व निधन याबद्दल सांगताना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रृंचा सागर वाहू लागला.
पौर्णिमा बावणे यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्राला हानी पोहचली असल्याचे आणि सामाजिक जान असलेली सुखा दुःखात धावणारी मैत्रीण हरवली नगरसेविका व कार्यक्रमाच्या आयोजिका छबु वैरागडे यांनी सांगितले. कार्यक्रमच संचालन सीमा भासरकर यांनी केले आयोजित कार्यक्रमात असंख्य महिलांची उपस्थिती होती.