उपचाराअभावी कोरोना रुग्णाचा वाहनातच मृत्यू
चंद्रपूर-
रुग्णालयात खाट उपलब्ध न झाल्याने येथील नगिना बाग परिसरातील 40 वर्षीय कोरोना बधिताचा स्वत:च्या वाहनातच उपचाराअभावी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 19 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाली असून, रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे.
अशातच येथील या कोरोना बाधित असलेल्या रुग्णाची स्थिती गंभीर झाली. त्यामुळे त्याचे नातेवाईक त्यांना घेऊन महानगरातील सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयात फिरले. परंतु, कुठेच खाटा उपलब्ध नव्हत्या. दरम्यान, वेळवर उपचार न मिळाल्याने त्यांचा स्वत:च्या वाहनातच मृत्यू झाला.

उपचाराअभावी कोरोना रुग्णाचा वाहनातच मृत्यू
Advertisements
Advertisements
Advertisements