खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांनी कोविड रूग्णालयात
जाऊन आरोग्य यंत्रणेची केली प्रत्यक्ष पाहणी
वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर आज वरोरा येथील ट्रामा कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय व माता महाकाली कोविड सेंटर, आदिवासी वसतिगृह येथील आरटीपीसीआर केंद्र तसेच विलगीकरण केंद्राला खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भेट दिली. येथील रुग्णांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधला व तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही तुमच्या नेहमी सोबत असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. त्यानंतर येथील वसतिगृह येथे वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेतली. त्यात काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, नगरसेवक राजू महाजन, वरोरा विधानसभा अध्यक्ष शुभम चिमुरकर, आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे यांची उपस्थिती होती. यावेळी अत्यावश्यक आरोग्य सुविधा ज्यांच्या तुटवडा जाणवत आहे. त्यांच्या आढावा घेण्यात आला. त्या आमदार निधीच्या माध्यमातून त्वरित उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
विश्वभारत News Website