Breaking News

वरोरा येथे साजिद(हाफिज) शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून.

Advertisements

वरोरा येथे साजिद(हाफिज) शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून.

वरोरा – अगदी दोन दिवसाच्या अंतराने हा दुसरा खून असून अवैध धंदे याचे मूळ कारण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी गांधी चौकात भर दिवसा निलेश ढोक नावाच्या मुलाने एका 26 वर्षीय अलाम नावाच्या मुलाचा खून केला होता त्याचा तपास सुरू असतांना आता सलग दुसरा खून झाल्याने वरोरा शहरात शांतता सुव्यवस्था बिघडली असल्याने नागरिक भयभीत झाले असल्याचे चित्र आहे

Advertisements

आज दिनांक 15 मे ला सायंकाळी 7.15 च्या दरम्यान दोन ते तीन अज्ञात इसमानी अंबादेवी वार्ड येथील महादेव मंदिर जवळ असलेल्या झोपडीत साजिद शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून केला असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. मृतक साजिद शेख हा आझाद वार्डात राहत असून तो अगोदर सट्टा चालवीत होता व आता गांजा विकत होता, तो एकटां असल्याच्या फायदा घेत दोन ते तीन आरोपींनी त्याच्यावर सहा राऊंड माऊजर ने दोन गोळ्या झाडल्या त्यापैकी एक छातीत तर दुसरी कानाखाली मारली विशेष म्हणजे आरोपींनी आपले शस्त्र (बंदूक ) डेड बॉडी जवळ ठेवून पोबारा केला. आरोपी हे तोंडाला फडके बांधून असल्याने त्यांचा शोध आता पोलीस कशाप्रकारे घेणार यावर सर्व अवलंबून आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

नागपुरात वकील महिलेने मागितली लाखांची खंडणी

कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा सुरू केल्याप्रकरणी ‘लॉकअप’मध्ये बंद असलेल्या आरोपीच्या पत्नीकडून तोतया महिला वकिलाने वरिष्ठ पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *