Breaking News

एकाच रात्री पाच दारूतस्करांना अटक  , 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisements

– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर,
शहरातील रामनगर पोलिस ठाणे हद्दीत दारूतस्करांविरुद्ध एकाच रात्री तीन कारवाया करण्यात आल्या. यावेळी 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत पाच तस्करांना अटक करण्यात आली. दारूतस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीनंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात या कारवाया करण्यात आल्या.

Advertisements

शहरातील रामनगर चौकात नाकाबंदी करीत पहिली कारवाई करण्यात आली. यावेळी एमएच 34 एम 9935 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली. यावेळी आरोपी शक्ती संजू शाह (वय 37, रा. वळण मार्ग चंद्रपूर), लक्ष्मीनारायण पुतान परसराम (वय 35, रा. अष्टभुजा वॉर्ड), रवींद्र विजय गुजर (वय 30, रा. अष्टभुजा वॉर्ड) हे तिघे वाहनात होते. वाहनातून विदेशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहन आणि दारूसाठा असा सुमारे 10 लाख 3 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisements

रेल्वेस्थानक चौकात दुसरी कारवाई करीत साजिद इसाक कुरेशी (वय 31, रा. शास्त्रीनगर, वणी) याला अटक केली. हा एमएच 29 एम 5967 क्रमांकाच्या ऑटोने दारूची तस्करी करीत होता. यावेळी दीड लाख रुपये किंमतीची देशी दारू, बिअर असा सुमारे दोन लाख चार हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जनता कॉलेज चौकात तिसरी कारवाई करण्यात आली. यावेळी एमएच 34 बीबी 1472 क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून दारूतस्करी केली जात होती. पोलिसांनी वाहनाची तपासणी करीत 1लाख रुपये किंमतीची देशी दारू आणि वाहन असा 6 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी चालक ईश्वर रमेश वाघमारे (वय 26, रा. हॉस्पिटल वॉर्ड, चंद्रपूर) याला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई अवैध दारूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर …

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *