Breaking News

मनपाची ३ प्रतिष्ठानांवर कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल

Advertisements
मनपाची ३ प्रतिष्ठानांवर कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल
चंद्रपूर, ता. २४ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
सोमवारी (ता. २४) मनपाद्वारे चंद्रपूर शहरातील झोन क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. २चे सहायक आयुक्त शीतल वाकडे, क्षेत्रिय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, भरत राजुरकर, अतिक्रमण पथक यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
झोन क्र. १ अंतर्गत कोव्हीड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत भावना पाईप अँड फिटींग, वेस्पा अँड सर्विसेस, एम. एस. फोम फेब्रीक यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन एकुण १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.  यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *