Breaking News

युथ इंटक चंद्रपूरचे आयोजन; रुग्ण, नातेवाईकांना भोजनदान-खासदार धानोरकर यांनी दिली भेट

खासदार धानोरकर यांनी दिली भेट
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना युथ इंटक जिल्हा चंद्रपूरच्या वतीने भोजनदान केले जाणार आहे. सोमवारी (ता. २४) खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे हॉटेल बंद असून, केवळ पार्सलची सुविधा आहे. सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळचे जेवण खरेदी करणे परवडण्याजोगे नसते. त्यामुळे युथ इंटकच्या पदाधिकाèयांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजनदान करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते आज या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दररोज सायंकाळी भोजनाचे डब्बे वितरित केले जाणार आहेत. यावेळी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष सोहेल रजा, इंटक युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत भारती, इंटक ट्रान्सपोर्ट युनियन चे जिल्हाध्यक्ष इरफ़ान शेख, दीपक पांडे, अनुताई दहेगावकर, अश्विनी खोब्रागडे, ऊर्जानगरच्या सरपंच पुष्पा उराडे,अशरफ़ खान, अमीर शेख, सोनू आगाशे, संजय कातकर, रहीम शेख, अमोल चवरे, गोलू धोपटे, शुभम चटप, आशिष खिरटकर, खुशाल भालेराव, किसान इटकर, सुनील पवार, तन्मय धोटे, जितेंद्र खिरटकर, रितेश जीवतोडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *