Advertisements
सिमेंटच्या बल्कर ट्रक मधून देशी दारूच्या १८ पेट्या जप्त.
(गडचांदूर पोलीस सध्या “एक्शन मोडवर”)
कोरपना(ता.प्र.)
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा वर्षांपासूनची दारूबंदी उठविण्यात आल्याची घोषणा नुकतीच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. “कहीं खुशी तो,कहीं गम” अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात असून याच धर्तीवर दारू दुकाने सुरू होईपर्यंत जितकी जास्त दारूविक्री करता येईल तितकी करून शेवटची कमाई करून घेण्याचा जणू चंगच अवैध दारू विक्रेत्यांंनी बांधला की काय अशी शंका निर्माण झाली आहे.सध्याच्या परिस्थीतीत काही दारू विक्रेते जोमाने कामाला लागल्याचे चित्र पहायला मिळत असून ठिकठिकाणी पोलिसांकडून कारवाईचे सत्र ही नियमितपणे सुरू आहे.असे असतानाच शेवटच्या क्षणी का होईना आता गडचांदूर पोलीसही अचानकपणे “एक्शन मोडवर” आल्याचे दिसून येते आहे.
कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर गडचांदूर येथील वार्ड क्रमांक ६ येथे सिमेंटची वाहतूक करणाऱ्या एका बल्कर ट्रक मध्ये अवैध दारू असल्याची गुप्त माहिती गडचांदूर पोलीसांना सूत्रांकडून मिळताच ठाणेदार गोपाल भारती यांनी पथकासह सदर ठिकाणी धाव घेऊन बल्कर ट्रक क्रमांक एमएच ३४ बीजी ६५९३ ची झडती घेतली असता त्यात (१८० एमएल बॉटल)देशी दारूच्या १८ पेट्या आढळून आल्या.सदर घटना २९ मे रोजीची असून यातील ३ आरोपी फरार असल्याची माहिती आहे.ट्रक अंदाजे किंमत ४० लाख, दारू किंमत १ लाख ८० हजार असा एकुण ४१ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करून सदर आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला.तिन्ही फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Advertisements