Breaking News

डाॅक्टर्स, परिचारीका, सफाई कामगार व रुग्णवाहीका चालक यांचा हंसराज अहिर यांनी  केला सन्मान

Advertisements

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळास 7 वर्षे पूर्ण
डाॅक्टर्स, परिचारीका, सफाई कामगार व रुग्णवाहीका चालक यांचा हंसराज अहिर यांनी  केला सन्मान

Advertisements

चंद्रपूर- संपूर्ण महाराष्ट्रात कोविड आजाराचे थैमान घातल्याने शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लाॅकडाऊन जाहिर केला आहे. या काळात जीवाची पर्वा न करता डाॅक्टर्स, परीचारीका, सफाई कामगार, रुग्णवाहीका चालक अविरत आपली सेवा देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकार कार्यकाळास 7 वर्ष पूर्ण झाले. त्याचे औचित्य साधून राजुरा तालुक्यातील कढोली व देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद येथे पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबिसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी भेट दिली. यावेळी कोविड काळात रुग्ण तपासणी, विविध वयोगटातील नागरीकाचे लसीकरण आदि सतत सेवा देणारे डाॅक्टर्स व परीचारीका तसेच सफाई कामगार, रुग्णवाहीका चालक यांचा हंसराज अहीर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कोविड लसीकरण व कोविड रुग्णंाची माहिती घेतली तसेच नागरीकांना लसीकरण करुन घेण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या सुचना अहीर यांनी केल्या व लस अत्यंत सुरक्षित असून नागरीकांनी न घाबरता लसीकरण करुन कोविड आजारापासून बचाव करण्याचे आवाहन ही त्यांनी नागरीकांना केले. सर्व डाॅक्टर्स, परीचारीका, सफाई कामगार, रुग्णवाहीका चालक यांचे ते देत असलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी कढोली व देवाडा ग्रामपंचायतीला जिल्ळा परिषद च्या माधमातून 15 व्या वित्त आयोग निधीतून ऑक्सीजन काॅन्सनट्रेटर खुशाल बोंडे , जि.प. सभापती सुनिल उरकुडे व माजी आ. सुदर्शन निमकर यांचे उपस्थितीत हंसराज अहीर यांचे हस्ते भेट देण्यात आले.
या प्रसंगी सतिष धोटे, वाघुजी गेडाम, प्रशांत घरोटे, हरीदास झाडे, दिलीप वांढरे, कैलाश कार्लेकर, जनार्दन निकोडे, सचिन शेंडे, पुरुषोत्तम लांडे, कढोली सरपंच राकेश हिंगाणे, शत्रुघ्न पेटकर, दिलीप हिंगाणे, माजी सरपंच पडवेकरताई, वामन तुराणकर, ईश्वर मुंडे, मंजूषा अनमुलवार, देवाडा सरपंच सौ. पंधरेताई, ग्रा.पं. सदस्य चेनवेलवार, जल्ला पोचा, मधुकर आत्राम आदिं ची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला …

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *