Breaking News

गडचांदूरात कित्येक नागरिकांचे “मास्क” गायब.

Advertisements
गडचांदूरात कित्येक नागरिकांचे “मास्क” गायब.
(शासन नियमांची सर्रास पायमल्ली, कारवाईची गती संथ.)
कोरपना(ता.प्र.):-
    कोरोनाच्या धर्तीवर लॉकडाऊन ते अनलॉक अशी वाटचाल सुरू असून यात शासनाने नुकतीच शिथिलता दिली आहे.मात्र मास्क, सोशल डिस्टंसिंगचे नियम सक्तीचे असून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचे संकेत दिले आहे.असे असताना गडचांदूर शहरात मात्र या नियमांची मोठ्याप्रमाणात पायमल्ली होताना दिसत आहे.शहराचा फेरफटका मारला तर कित्येक नागरिक विना मास्क वावरताना दिसतात.संबंधित विभागाकडून संथ गतीने सुरू असलेल्या कारवाईचे हे फलीत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कोरोना संबंधी शासनाने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडवत शहरात बिनधास्त विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई होणे काळाची गरज बनली आहे.
   अनलॉक नंतर जीवनावश्यक व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी मिळाली.यात नियमित व व्यवस्थितपणे मास्कचा वापर,सोशल डिस्टंसिंगचे पालण,ग्राहकांसाठी प्रत्येक दुकानांच्या प्रवेशद्वाराजवळ साबन, सॅनिटायजरची व्यवस्था बंधनकारक केली असतानाच याठिकाणी काही अपवाद वगळता बऱ्याच दुकानदारांनी याला तिलांजली दिल्याचे चित्र आहे.यात काही पेट्रोल पंपाचे कर्मचारी, भाजी,फळ विक्रेते,हॉटेल व्यावसायिकही मागे नाही.शासनाने कोरोना नियमाचे पालण करण्याबाबत सूचना केल्या तरीपण याची नीट अंमलबजावणी होताना दिसत नसून अशीच परिस्थीती पुढेही राहिली तर ही धोक्याची घंटीच, असे मत व्यक्त होत आहे.ही बाब लक्षात घेता स्थानिक नगरपरिषद,आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासनाने कारवाईची गती वाढवून कोरोना संबंधी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर करवाई करण्याची मागणी होत आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *