Breaking News

‘पीडब्लूडी’त पदोन्नती कागदावरच

Advertisements

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) काही उपविभागीय अभियंत्यांची पदोन्नती हॊऊनही रुजू न झाल्याची माहिती आहे.

Advertisements

त्यामुळे मागील तीन महिन्यापासून आपल्या आवडीच्या ठिकाणी पदस्थापना मिळावी, यासाठी या अभियंत्यांचा खटाटोप सुरु आहे. मागील जून मध्ये जवळपास संपूर्ण राज्यातून 15 उपविभागीय अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पदोन्नती देण्यात आली होती. त्यापैकी 6 अभियंते नागपूर विभागातील आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतेही अधिकारी रुजू न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुन्हा मुंबईच्या चकरा मारून आवडत्या ठिकाणी पदस्थापना मिळविण्याचा प्रयत्न तर अभियंते करीत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

खाण्यात भेसळ झाल्यास थेट तुकाराम मुंढेकडे करा तक्रार!

भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा आरोग्यास अपायकारक रसायनांचा वापर केल्यावरून अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *