Breaking News

बदलीसाठी आग्रह धरू नका

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

भरती झालेले अन्य जिल्ह्यातील शिक्षक नियुक्ती नंतर पुन्हा आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी आग्रही असतात. बदली करून घेणे हा तुमचा हक्क आहे. परंतु, ज्या जिल्ह्यात भरती झाली, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण ज्ञानदान करणे गरजेचे आहे. त्यासाठी तत्काळ बदलीचा आग्रह न धरता थोडा धीर धरावा, असा सल्ला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.

शिक्षण सेवकांच्या मानधनाचा प्रश्‍न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या ५ ते ६ हजार रुपये तुटपुंजे मानधन मिळते. मात्र, त्यांचा प्रश्‍न सुटावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून, मानधनाचा आकडा १२ ते १५ हजारांपर्यंत करण्यासाठी प्रयत्न करीन, असेही ते म्हणाले.

Advertisements

शिक्षक,केंद्रप्रमुखांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी लवकरच शासन धोरण ठरवेल,असेही ते म्हणाले.भरती होणाऱ्‍या शिक्षकांनी तत्काळ बदलीसाठी आग्रह धरू नये. जोपर्यंत येथील मुलांची पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत तेथेच काम करण्याची गरज आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही तांत्रिक गोष्टी असल्यामुळे हा प्रश्‍न रेंगाळला आहे. येत्या काळात आवश्यक पाठपुरावा केंद्राकडे करण्यात येईल.’

Advertisements

About विश्व भारत

Check Also

हे काय सुरु आहे?नागपुरातील मतदानात तफावत

नागपूर लोकसभेसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच …

रेतीच्या ट्रॅक्टरने कोतवालास चिरडले : घटनास्थळीच…!

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल विभागाच्या कोतवालास ट्रॅक्टरने चिरडले. या कोतवालाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *