Breaking News

एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर? अमित शाहसोबत चर्चा… वाचा

विश्व भारत ऑनलाईन :

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जाऊ लागले.

खडसे यांचे स्पष्टीकरण

खुद्द खडसे यांनीच या सगळ्यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय. ‘एकाच घरात दोन लोकं दोन वेगवेगळ्या पक्षात असणं काही नवं नाही. आमच्याही घरात तसं आहे’, असं त्यांनी म्हटलंय. शिवाय भाजपमध्ये जाण्याच्या वृत्ताचंही एकनाथ खडसे यांनी खंडन केलंय.

अमित शाहसोबत चर्चा

अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री आहे. त्यासाठी त्यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती’, असंही खडसे यांनी म्हटलंय. मुळात एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्यात भेट होणार होती. पण अमित शाह यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही भेट शक्य होऊ शकली नाही. म्हणून फोनवरुन त्यांनी अमित शाह यांच्याशी संवाद साधला होता, अशी माहिती रक्षा खडसे यांनी दिली. त्यावरुन पत्रकारांनी रक्षा खडसे यांना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न केला होता.

About विश्व भारत

Check Also

MVA की बैठक में विधानसभा सीटों पर हुई चर्चा : उद्धव ठाकरे की डिमांड

मुंबई में MVA की बैठक में विधानसभा सीटों पर हुई चर्चा, उद्धव ठाकरे की डिमांड? …

पूर्व सीएम ठाकरे ने CM शिंदे की फोटो पर जूते मारा! संजय निरुपम भडके

पूर्व सीएम ठाकरे ने CM शिंदे की फोटो पर जूते मारा! संजय निरुपम भडके ? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *