Breaking News

राजकीय धक्का, कुस्तीपटू ते राजकारणी : मुलायम सिंह यादव यांचे निधन

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.22 ऑगस्टपासून त्यांना श्वास घेण्यात अडचण येत होती. आणि रक्तदाबाच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Advertisements

प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्यामुळे 1 ऑक्टोबरपासून त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले.पण अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. यंदाच मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी, साधना गुप्ता यांचेही निधन झाले होते.

Advertisements

कुस्तीपटू ते राजकारणी

22 नवंबर 1939 ला जन्मलेल्या मुलायम यांचा पाच भावंडांमध्ये तिसरा क्रमांक. त्यांनी कुस्तीपटू म्हणून आपल्या आयुष्यातील एका नव्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पुढे ते प्राध्यापकही झाले. महाविद्यालयांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. पुढे राजकारणातील गुरु, नत्‍थू सिंह यांना प्रभावित केल्यानंतर त्यांनी जसवंतनगर विधानसभा सीटवरून निवडणुकांच्या रिंगणात पाऊल ठेवलं. 1982-1985 पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर लोकसभा निवडणुकीतील मतदान कमी झाल्याचा मुद्दा नागपूर हायकोर्टात!

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी पाच लाखांच्या अंतराने जिंकून येतील, असा दावा भाजपतर्फे केला जात …

कांग्रेस ने मोदी सरकार की 10 वर्षों नाकामयाबी को बताया ‘अन्याय काल’, सरकार गिराने से लेकर अर्थव्यवस्था को दिलाया याद

कांग्रेस ने मोदी सरकार की 10 वर्षों नाकामयाबी को बताया ‘अन्याय काल’, सरकार गिराने से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *