Breaking News

रानकुत्र्यांनी केली वाघाची शिकार : झुंजीत मृत्यूची शक्यता

Advertisements

चंद्रपूरातील नागभीड तालुक्यातील किटाळी गावालगतच्या जंगलात वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वाघाचे आणि रानकुत्र्यांच्या पायाचे ठसे आढळले. त्यामुळे वाघाचा मृत्यू अन्य एखाद्या वाघासोबत किंवा रानकुत्र्यांसोबत झालेल्या झुंझित झाल्याची शक्यता वनखात्याने वर्तवली आहे.

Advertisements

मृत वाघ अंदाजे २ ते २.५ वर्षांचा असून वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोस्टमार्टमनंतर घटनास्थळीच वाघावर अंत्यसंस्कार करणार असल्याचे वनविभागाने सांगितले.

Advertisements

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांत वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना परत वाघ ठार झाल्याची घटना घडल्याने चिंतेचे वातावरण आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात ४ डिसेंबर रोजी वाघाचे चार बछडे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.

दोनच दिवसांपूर्वी १ डिसेंबर रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात आगरझरी कक्ष क्र. १८९ मध्ये सुमारे ६ ते ७ महिन्यांचा एक मादी बछडा मृतावस्थेत आढळून आला होता. या मादी बछड्याचा मृत्यू इतर नर वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे शरीरावरील खुणा तसेच घटनास्थळावरील परिस्थितीवरून दिसून आले होते. या चारही बछड्यांना नर वाघाने ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज फिल्ड डायरेक्टर जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केला होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अरवली पर्वत वाचविण्याची धडपड!

✍️लेखक : *रमेश लांजेवार* (मुक्त पत्रकार ) 📱9921690779 अरवली पर्वतांचे खनन खूप जुन्या काळापासून सुरू …

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…!

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी। पेंच टाइगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *