स्तन कर्करोगाशी झुंज देणारी अभिनेत्री हमसा नंदिनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिला २०२१ मध्ये स्तनाचा कर्करोग झाला होता. जवळपास वर्षभर तिने या आजाराशी लढा दिला. या जीवनाच्या लढाईत अभिनेत्रीच्या धैर्याचा विजय झाला आहे. ती तिच्या ३८ व्या वाढदिवशी आनंदाने सेटवर परत आलीय.
हमसा नंदिनी ही साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. ‘लोकयम’ आणि ‘पंथम’ सारख्या चित्रपटांनी धमाल उडवून दिली होती. या अभिनेत्रीच्या प्रत्येक अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले आहे. पण, आपल्या सौंदर्याचा प्रसार करणारी हमसा गेल्या एक वर्षापासून कॅमेऱ्यापासून दूर आहे. डिसेंबर २०२१ मध्ये तिने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितले की, तिला स्तनाचा कर्करोग झाला आहे. २०२२ मध्ये तिने कॅन्सरची लढाई जिंकली.
विश्वभारत News Website