Breaking News

आयुक्तांचा दणका : औरंगाबाद महापालिकेतील १९ कर्मचारी निलंबित

Advertisements

औरंगाबाद महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी तब्बल १९ सफाई कामगारांना तडकाफडकी निलंबित केले. सतत गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांची यादी आयुक्तांनी मागविली होती. ही यादी प्राप्त होताच त्यांनी सोमवारी सायंकाळी १९ जणांवर निलंबनाची कारवाई केली.

Advertisements

महापालिकेच्या घनकचरा विभागात सुमारे सोळाशे सफाई कामगार आहेत. मात्र, बरेच कामगार हे कामावर हजर नसतात. त्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे आयुक्त चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी विविध भागांमध्ये फिरुन स्वत: पाहणी केली होती. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सतत गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या अधिकाऱ्यांकडून नुकत्याच या याद्या सादर करण्यात आल्या. त्यात १९ कायम कामगार आणि २ दैनिक वेतनावरील कामगारांचा समावेश होता. कायम कर्मचाऱ्यांमधील बहुतांश कर्मचारी हे सफाई कामगार आहेत. सर्व १९ कायम कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त चौधरी यांनी सोमवारी सायंकाळी जारी केले. निलंबित कामगारांची विभागीय चौकशी सुरू केली जाणार आहे. महापालिका आयुक्त चौधरी यांनी एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Advertisements

स्वच्छता निरीक्षकांना घरचा रस्ता

सफाई कामगारांसोबतच ३ कंत्राटी स्वच्छता निरीक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय दैनिक वेतनावरील २ कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्याचे आदेश आयुक्त चौधरी यांनी दिले आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भाजप आमदाराच्या ‘पीए’ची अधिकाऱ्याला शिवीगाळ : जंगल सफारी

भाजपचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक (पीए) महेश प्रेमळवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील …

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं टेकचंद्र शास्त्री: 9822550220   बिहार। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *