Breaking News

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचे आर्थिक शोषण

Advertisements

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नगरपालिका प्रशासनाकडून आकारण्यात येणारी विविध शुल्क वसुली थांबवावी, अशी मागणी होत आहे. ही वसुली तात्काळ थांबवून नियमानुसार लाभार्थ्यांना योजनेचे हप्ते वाटप करावेत, अशी मागणी समोर येत आहे.परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना याबाबतचे बुधवारी काही जणांनी निवेदन दिले.

Advertisements

काय आहे निवेदनात?

Advertisements

मानवत नगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कार्यालयीन, विकास व प्रशासन शुल्क आणि मालमत्ता कर असे एकूण 12500 रुपयांची आकारणी केली जात आहे. सदरील योजनेचे लाभार्थी हे आर्थिक दुर्बल घटकातील असल्याने ते हे शुल्क भरू शकत नाही. तरी नगरपालिकेने फक्त मालमत्ता कराचीच वसुली करून अन्य शुल्क माफ करावे. तसेच अनेक लाभार्थ्यांचे हप्ते शासनाकडे थकीत असून सदरील हप्ते तात्काळ अदा करावेत असेही निवेदनात नमूद आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

वृक्षारोपण घोटाळा : मुख्य अभियंता घोगरे यांचे दोषींना अभय : मराठवाड्यातील अपंग जलप्रकल्पांची व्यथा

औरंगाबाद जिल्ह्यात जलसंपदा विभागाने वृक्षारोपण घोटाळा केला आहे. यात अभियंता गोडसे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार …

महाराष्‍ट्र गुजरातला देणार वाघ : बदल्‍यात कोल्‍हा अन् इमू मिळणार

मागील काही महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक नियोजित उद्योग गुजरात राज्यात गेल्याचा आरोप झाला. त्यावरून राजकीय वातावरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *