Breaking News

नाना पटोलेंवर सत्यजित तांबेंचा गंभीर आरोप

Advertisements

✍️मोहन कारेमोरे :

Advertisements

नाशिक पदवीधर निवडणुकीतून विजय झालेले सत्यजित तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला जाणीवपूर्वक अडचणीत आणून काँग्रेसने काय साध्य केलं, असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला. नाना पटोले यांनी तर माझा फोनही उचलला नाही. माझ्या विरोधात खोटा प्रचार केला, असा आरोप तांबे यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisements

काँग्रेस सोडणार का?

सत्यजित तांबे आणि स्व. विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांच्याबद्दल कॉंग्रेसचे जेष्ठ माजी आमदार धनाजीराव साठे यांनी एक मोठं विधान केले आहे. खरंतर सत्यजित तांबे यांच्यावर कॉंग्रेसकडून कारवाई केली जाणार असल्याची परिस्थिती असतांना हे विधान केल्यानं राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सत्यजित तांबे आणि आमदार धिरज देशमुख यांच्या विषयी कॉंग्रेसचे ज्येष्ठ माजी आमदार धनाजीराव साठे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरातांच्या घरात भेद निर्माण करण्याचे काम भाजपकडुन सुरु आहे. बाळासाहेब थोरातांना वडिलांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र थोरातांच्या नातेवाईकांना आता बाळासाहेब थोरातच का ? आपण पण नेता व्हावं असं वाटु लागल्याने त्यांच्या अपेक्षा वाढु लागल्या आहेत. त्यातुनच सत्यजित तांबेचा विषय आज समोर आलाय आहे असं स्पष्टच धनाजीराव साठे यांनी म्हंटले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

महाराष्ट्र में ‘महायुति’ पर भारी पड़ेगा MVA अलायंस?

महाराष्ट्र में ‘महायुति’ पर भारी पड़ेगा MVA अलायंस? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई। शरद …

BJP मे शामिल होने को बेताब है पूर्व CM उद्धव ठाकरे? आदित्‍य ठाकरे का दो टुक बयान

BJP मे शामिल होने को बेताब है पूर्व CM उद्धव ठाकरे? आदित्‍य ठाकरे का दो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *