Breaking News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय वाढवा-खासदाराची मागणी

Advertisements

बऱ्याच वर्षांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्याचा मुद्दा चर्चेत आहे. आधी राज्य सरकारने जुनी पेन्शन आणि आता सेवानिवृत्त वयोमर्यादा वाढविण्याची मागणी चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बंडू धानोरकर यांनी केली आहे.

Advertisements

केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करण्यात यावी, अशी मागणी खासदार धानोरकर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मागणीकडे किती लक्ष देतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Advertisements

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात आमदार सुधाकर अडबाले यांच्या विजयानिमित्त गांधी चौक चंद्रपूर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. राज्यातील काँग्रेस आमदारांनी हा प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्तारांची भाजपविरोधात भूमिका

छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातून महायुतीमध्ये शिवसेनेला (शिंदे) उमेदवारी …

उपजिलाधिकारी अरविंद माहौर को पुलिस ने दुष्कर्म के आरोप में किया गिरफ्तार

उपजिलाधिकारी अरविंद माहौर को पुलिस ने दुष्कर्म के आरोप में किया गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *