Breaking News

तुमसर, भंडारा, गोंदियात युरियाचा तूटवडा : शेतकरी चिंतेत

Advertisements

ऐन रब्बी‎ हंगामात पूर्व विदर्भात(भंडारा, तुमसर, गोंदिया) युरिया खताचा तुटवडा‎ निर्माण झाला आहे. रब्बीच्या ‎उत्पादनात घट होऊ शकते. ‎शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण‎ आहे.अति पावसामुळे खरीप हंगाम ‎पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकरी‎ आधीच मेटाकुटीला आला आहेत.‎ असे असताना खरिपातील‎ नुकसान रब्बी हंगामात भरुन‎ काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नरत‎ आहेत.

Advertisements

मात्र, ही आशाही आता‎ पूर्णतः मावळताना दिसत आहे.‎ जानेवारीमध्येच युरिया खताचा‎ तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी‎ दुकानामध्ये युरिया मिळत‎ नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले‎ आहेत. ग्रामीण भागातील कृषी‎ दुकानांमध्ये खत मिळत नसल्यामुळे‎ शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येत‎ आहेत. मात्र, तेथेसुद्धा खत उपलब्ध‎ ‎नसल्याचे कृषी दुकानदार‎ शेतकऱ्यांना सांगत आहेत. काही‎ कृषी दुकानदारांकडे युरिया खत‎ उपलब्ध असताना देखील खताचा‎ तुटवडा दाखवून शेतकऱ्यांकडून‎ अधिकची रक्कम घेण्यात येत आहे.‎ याचा शेतकऱ्यांना फटका बसत‎ असून उत्पन्नावर परिणाम होत‎ आहे. कृषी विभागातील वरिष्ठ‎ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन‎ खत उपलब्ध करून देण्याचे मागणी‎ शेतकऱ्यांमधून होत आहे.‎

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अरवली पर्वत वाचविण्याची धडपड!

✍️लेखक : *रमेश लांजेवार* (मुक्त पत्रकार ) 📱9921690779 अरवली पर्वतांचे खनन खूप जुन्या काळापासून सुरू …

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…!

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी। पेंच टाइगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *